Etofylline/Etophylline
Etofylline/Etophylline बद्दल माहिती
Etofylline/Etophylline वापरते
Etofylline/Etophylline ला क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मुनरी डिसऑर्डर (COPD) टळण्यासाठी आणि याच्या उपचारात वापरले जाते.
Etofylline/Etophylline कसे कार्य करतो
Etofylline/Etophylline फुप्फुसांमधल्या स्नायुंना शिथिल करते, ज्यामुळे श्वसन मार्ग मोकळा होऊन श्वास घेणे शक्य होते. एटोफाईलाइन, थियोफाईलाइनचे एक डेरिवेटिव्ह आहे जे जैन्थिन नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हे स्नायुंना शिथील करुन, श्वसनात सुधारणा आणण्यासाठी वायुमार्ग खुले करुन आणि , उत्तेजकांबद्दल फुप्फुसांच्या प्रतिक्रियेला कमी करुन वायुमार्गांवर काम करते.
Common side effects of Etofylline/Etophylline
अन्न खावेसे न वाटणे, डोकेदुखी, पोटात अस्वस्थता, अस्वस्थता
Etofylline/Etophylline साठी उपलब्ध औषध
Etofylline/Etophylline साठी तज्ञ सल्ला
- तुम्हाला कोणत्याही यकृताच्या समस्या थायरॉईड विकार, उच्च रक्तदाब, फेफऱ्यांचा इतिहास, पोटात व्रण असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा धूम्रपान किंवा अल्कोहोल सेवनाचा इतिहास असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्ही वयस्कर रुग्ण असाल किंवा हृदयाच्या समस्या असतील किंवा हायपोक्सेमिया (रक्तातील अतिशय कमी ऑक्सीजन स्तराची स्थिती) खबरदारीने वापरा.
- तुमची दम्याची लक्षणे आणखी बिघडल्यास तत्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- इटोफायलीन, अन्य झांथीन उपपदार्थ किंवा त्यांच्या कोणत्याही घटकांना अलर्जिक असल्यास ते घेऊ नका.
- सहा वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्यास घेऊ नका.
- हृदय विकाराचा झटका किंवा फिट्सचा इतिहास असल्यास घेऊ नका.
- पोटातील व्रणांचा (पेप्टिक अल्सर्स) त्रास असल्यास घेऊ नका.