होम>insulin glargine
Insulin Glargine
Insulin Glargine बद्दल माहिती
Insulin Glargine कसे कार्य करतो
Insulin Glargine हे दीर्घकाळ क्रिया करणारे इन्श्युलिन आहे, हे इंजेक्शननंतर 24 कार्यरत असते. हे शरीराद्वारे निर्माण केल्या जाणा-या इन्शुलिनप्रमाणेच काम करते. इन्श्युलिन स्नायुंमध्ये व फॅट सेलमध्ये ग्लुकोजच्या पुन्हा वापराची सुविधा देते आणि ते लिव्हरमधून ग्लुकोज मुक्त होण्यावर प्रतिबंध आणते.
Common side effects of Insulin Glargine
रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय प्रमाणात घटणे, इंजेक्शनच्याजागी त्वचेवर अलर्जी येणे
Insulin Glargine साठी उपलब्ध औषध
LantusSanofi India Ltd
₹640 to ₹21364 variant(s)
BasalogBiocon
₹565 to ₹17826 variant(s)
BasugineLupin Ltd
₹640 to ₹11532 variant(s)
GlaritusWockhardt Ltd
₹450 to ₹21368 variant(s)
GlarviaPfizer Ltd
₹4751 variant(s)
XglarEris Lifesciences Ltd
₹610 to ₹32043 variant(s)
Nobeglar UNOMankind Pharma Ltd
₹6851 variant(s)
BasaglarCipla Ltd
₹640 to ₹7692 variant(s)
NobeglarMankind Pharma Ltd
₹610 to ₹8223 variant(s)
Xglar OneEris Lifesciences Ltd
₹7691 variant(s)
Insulin Glargine साठी तज्ञ सल्ला
- तुम्ही गर्भवती असाल किंवा गर्भधारणेचे नियोजन करत असाल किंवा स्तनपान करवत असाल तर इन्सुलिन ग्लार्जिन घेताना विशेष काळजी घ्या; जर तुम्हाला मूत्रपिंड किंवा यकृताच्या समस्या; मधुमेह असेल
- इन्सुलिन घेताना मद्यपान करणे टाळा
- थांबा आणि तत्काल तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधाजर तुम्हाला कोणतीही अलर्जिक प्रतिक्रिया अनुभवाला आली जसे की लालसरपणा, सूज, पुरळ आणि खाज इंजेक्शनच्या जागी आली, पुरळ, खाज किंवा फोड त्वचेवर आले, छाती चोंदणे किंवा श्वास घेण्यास अवघड गेले, चेहरा, ओठ, जीभ किंवा शरीराचे अन्य भाग सुजले; किंवा रक्तातील साखरेची पातळी घटल्याचा अनुभव लक्षणांद्वारे आल्यास जसे थंडीत घाम; थंड फिकट त्वचा, डोकेदुखी, वेगाने हृदयगती, आजारी वाटणे, अतिशय भूक लागणे, दृष्टितील तात्पुरते बदल,गळून जाणे,असामान्य थकावट आणि अशक्तपणा;अस्वस्थता किंवा कंप, चिंता वाटणे, संभ्रमित वाटणे, एकाग्रता करण्यास अवघड जाणे.
- विटामिन्स आणि वनौषधीसह, तुम्ही घेत असलेल्या सर्व औषधांची माहिती डॉक्टरांना द्या.
- तुम्ही दातांवरील शस्त्रक्रियेसह अन्य शस्त्रक्रिया करुन घेणार आहात, तुम्ही इन्सुलिन ग्लार्जिन वापरत आहात हे तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- इन्सुलिन ग्लार्जिन मिश्रणे त्वचेच्या थराखाली इंजेक्ट करायची असतात. शीर किंवा स्नायूत याचे इंजेक्शन घेऊ नका.
- इंजेक्शनच्या जागा दंड (डेल्टॉईड), ओटीपोट, नितंब आणि मांडीच्या भागात प्रत्येक इंजेक्शनच्या वेळी बदला, जेणेकरुन इंजेक्शनची प्रत्येक जागा 1 किंवा 2 आठवड्यांमध्ये एकापेक्षा अधिक वेळा वापरली जाणार नाही; इंजेक्शनच्या जागी त्वचेमधील बदल कमी करण्यासाठी असे करावे.
- इन्सुलिन किंवा इन्सुलिन ग्लार्जिनची दोन मिश्रणे पातळ किंवा एकत्र करु नका. तसेच दक्षता घ्या की ताकद, निर्माता, प्रकार, मूळ किंवा तयारीची पद्धत यांच्यामुळे मात्रेत बदल करावा लागू शकतो.
- इन्सुलिन ग्लार्जिन मिश्रण स्वच्छ आणि रंगहीन दिसत नसेल किंवा त्यामध्ये कण दिसत असल्यास ते वापरु नका.
- कार्टरीज लोड करणे, सुई जोडणे, सुरक्षा चाचणी घेणे आणि इन्सुलिन इंजेक्शन घेणे यासाठी इन्सुलिन ग्लार्जिन कुपी/कंटेनरवर दिलेल्या सूचना वाचा आणि त्यांचे पालन करा.
- तुम्हाला हायपोग्लायसेमियाची कोणतीही लक्षणे दिसल्यास (जसे की थंडीत घाम; थंड फिकट त्वचा, डोकेदुखी, जलद हृदयगती, आजारी वाटणे, अतिशय भूक लागणे, दृष्टिमधील तात्पुरता बदल, गळून जाणे, असामान्य थकवा आणि अशक्तपणा; अस्वस्थता किंवा कंप, चिंता वाटणे, संभ्रमित वाटणे, एकाग्रता करणे अवघड जाणे) तुम्ही साखर किंवा कार्बोहायड्रेट्स खाऊन तत्काळ रक्तातील साखर वाढवणे आवश्यक आहे.
- गाडी चालवणे किंवा मशीन हाताळताना खबरदारी घेतली पाहिजे कारण यामुळे लक्ष एकाग्रतेची किंवा प्रतिक्रिया देण्याची तुमची क्षमता तुम्हाला रक्तात कमी साखर असेल किंवा तुमच्या दृष्टिमध्ये समस्या असतील तर कमी होऊ शकते.