होम>sodium diatrizoate
Sodium Diatrizoate
Sodium Diatrizoate बद्दल माहिती
Sodium Diatrizoate कसे कार्य करतो
सोडियम डायट्रिजोएट एक अमिनोबेन्जोइक ऍसिड आहे जे कॉन्ट्रास्ट मीडिया नावाच्या औषधांच्या वर्गात मोडते. यामध्ये आयोडीन असते ज्यामधून निघण्यासाठी एक्स-रे असमर्थ असतात उदा. मानवाच्या शरीरातील हाडे , अशाप्रकारे याचा उपयोग इमेजचा दर्जा आणखीन चांगला बनवण्यासाठी एक्सरे कॉन्ट्रास्ट एजंटच्या स्वरुपात केला जातो.
Common side effects of Sodium Diatrizoate
उलटी, अन्न खावेसे न वाटणे
Sodium Diatrizoate साठी उपलब्ध औषध
Sodium Diatrizoate साठी तज्ञ सल्ला
- तुमच्या यकृत किंवा मूत्रपिंडाच्या कार्यावर गंभीर परिणाम झाला असेल, हृदय आणि रक्ताभिसरणासंबंधीचा आजार असेल, मेंदूच्या रक्तवाहिन्यांचा खूप बळावलेला विकार ( सेरेब्रल आर्टरिओस्क्लेरॉसिस- यामध्ये मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या भिंती किंवा आवरण जाड होते.), आकडी येणे, मेंदूसंबंधी इतर काही समस्या, लकव्याचा पूर्वेतिहास असल्यास डॉक्टरांना त्याविषयी माहिती द्या.
- तुम्ही जर डायबिटिस मेलिटसकरता उपचार घेत असाल, जर हायपर थायरॉइडिझम ( ओव्हरअँक्टिव्ह थायरॉईड ग्रंथी), मल्टीपल मायलोमा (रक्तपेशींचा कर्करोग), स्नायू दौर्बल्यामुळे येणारा थकवा ( मायस्थेनिया ग्रेव्हिस), पॅराप्रोटिनेमिया हा काही विशिष्ट प्रथिनांची जास्त प्रमाणात निर्मिती होण्यासंबंधीचा आजार, अड्रेनल ग्रंथीतील ट्यूमरमुळे होणारा उच्च रक्तदाब (फिओक्रोमोसायटोमा) , पल्मनरी एमफिसेमा( श्वसनावर परिणाम करणारा फुप्फुसांचा गंभीर आजार ) असेल तर डॉक्टरांना त्याची कल्पना द्या.
- गरोदर, गर्भधारणेसाठी प्रयत्नशील किंवा स्तनदा माता असाल तर डॉक्टरांना सांगा
- सोडियम अट्रिझोएट अथवा त्यातील इतर घटकांची अलर्जी असलेल्या रुग्णांनी ते घेऊ नये.