Apraclonidine
Apraclonidine बद्दल माहिती
Apraclonidine वापरते
Apraclonidine ला काचबिंदू (डोळ्यातला उच्च दबाव)च्या उपचारात वापरले जाते.
Apraclonidine कसे कार्य करतो
Apraclonidine डोळ्याच्या बाहुलीमधला दबाव कमी करते.
Common side effects of Apraclonidine
डोळ्यात बाहेरून काहीतरी गेल्याची संवेदना , अंधुक दिसणे, तोंडाला कोरडेपणा, त्वचारोग ( डर्मेटिटिस), डोळ्यांमध्ये जळजळणं, डोळ्यात दंश झाल्याची भावना, डोळे खाजणे, डोळ्यामध्ये अलर्जीचे परिणाम
Apraclonidine साठी उपलब्ध औषध
AlfadropsCipla Ltd
₹401 variant(s)
Apraclonidine साठी तज्ञ सल्ला
- डोळ्याच्या लेजर शस्त्रक्रियेच्या दरम्यान अशा प्रसंगांचा इतिहास असलेल्या रुग्णांमध्ये अचानक शुद्ध हरपण्याच्या प्रसंगावर लक्ष ठेवावे.
- डोळ्यामधील द्रवाच्या दाबामधील अति घसरणीसाठी तुमच्यावर लक्ष ठेवावे लागेल.
- छातीत वेदना, पुरेसे रक्त पंप करण्याची हृदयाची असमर्थता, अलिकडील हृदय विकाराचा झटका, हृदय निकामी होणे, मेंदूला रक्त पुरवठा अतिशय कमी होणे, दीर्घकालीन मूत्रपिंड निकामी होणे, यकृत निकामी होणे, रक्तवाहिन्यांची विकृती किंवा उद्विग्नता असलेल्या लोकांमध्ये अप्राक्लोनीडीनचा वापर खबरदारीने केला पाहिजे.
- हृदयाच्या समस्यांसाठी (बिटा-ब्लॉकर्स (आय ड्रॉप्स किंवा तोंडावाटे), अँटीहायपरटेन्सिव, आणि कार्डियाक ग्लायकोसाईड्स (उदा. डिजिटॅलिस) एकाचवेळी औषधे घेत असलेल्या रुग्णांमध्ये आणि डोळ्यांवरील शस्त्रक्रिया करवून घेत असलेल्या रुग्णांमध्ये हृदय गती आणि रक्तदाब वारंवार तपासण्यास सांगितले जाते.
- प्रदूषण टाळण्यासाठी आय ड्रॉप बॉटलचे वरचे टोक तुमची बोटे, डोळे किंवा आसपासच्या भागाला स्पर्श होऊ देऊ नका. बॉटल वापरात नसताना घट्ट बंद करुन ठेवा.
- अप्राक्लोनिडाईन आय ड्रॉप्स टाकल्यानंतर, तुम्हाला आणखी आय ड्रॉप टाकायचा असेल तर किमान ५ मिनिटे थांबा.
- तुम्ही गर्भवती असाल, गर्भधारणेचे नियोजन करत असाल किंवा स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- गाडी किंवा यंत्र चालवताना खबरदारी घ्या कारण अप्राक्लोनिडाईनमुळे गरगरणे किंवा झोप येणे उद्भवू शकते.