Raltegravir
Raltegravir बद्दल माहिती
Raltegravir वापरते
Raltegravir ला एच आय व्ही संक्रमणच्या उपचारात वापरले जाते.
Raltegravir कसे कार्य करतो
Raltegravir विषाणुत अशा रसायनाच्या क्रियेला थांबवते जे रुग्णात त्याच्या वाढीला मदत करते.
Common side effects of Raltegravir
निद्रानाश, थकवा, डोकेदुखी, अन्न खावेसे न वाटणे, गरगरणे, स्नायू वेदना, अतिसार, यकृतातील एन्झाईम वाढणे
Raltegravir साठी उपलब्ध औषध
ZepdonCipla Ltd
₹83041 variant(s)
IsentressMSD Pharmaceuticals Pvt Ltd
₹86891 variant(s)
RaltegravirGlobela Pharma Pvt Ltd
₹86891 variant(s)
Raltegravir साठी तज्ञ सल्ला
- तुम्हाला जर फेनिलकिटोनुरिया ( गंभीर अनुवांशिक आजार) , डिप्रेशनची समस्या किंवा इतर मानसिक आजार , यकृत अथवा स्नायूंचा विकार (मायोपॅथी किंवा –हाबडोमायलोसिस) असेल तर राल्टेग्राव्हिर घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- राल्टेग्राव्हिरचे उपचार सुरू असताना सांधे आखडणं किंवा दुखणं, सांध्यांची हालचाल करणं कठीण होणं, स्नायूंची वेदना, अशक्तपणा, टेंडरनेस किंवा तापासारखी इतर काही संसर्गाची चिन्हं दिसून आली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा
- .राल्टेग्राव्हिर घेण्याच्या दोन तास आधी किंवा घेतल्यानंतर दोन तासांमध्ये अल्युमिनियम किंवा मॅग्नेशियमचा समावेश असलेली अँटासिडस् घेणं टाळा.
- राल्टेग्राव्हिर घेतल्यानंतर गरगरत असेल तर यंत्र हाताळू नका किंवा वाहन चालवू नका.
- राल्टेग्राव्हिर रक्त किंवा लैंगिक संबंधातून इतरांना होणारा एचआयव्ही विषाणूचा प्रसार रोखू शकत नाही त्यामुळे हा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक सावधगिरी बाळगावी.
- तुम्हाला बरं वाटत असलं तरी राल्टेग्राव्हिर घेत रहा. कारण औषध चुकवल्यानं तुमची स्थिती आणखी बिकट होऊन उपचारात अडथळा येऊ शकतो.
- राल्टेग्राव्हिरचे उपचार सुरू असताना तुमच्या शरीरातील चरबी वाढू शकते किंवा स्तन, पाठीच्या वरील भागात अशा शरीरातील निरनिराळ्या जागी ती साठू शकते.
- गरोदर राहण्याचा विचार करत असाल, गरोदर किंवा स्तनदा असाल तर डॉक्टरांना त्याविषयी माहिती द्या. तुमच्या बाळाला एचआयव्हीचा संसर्ग टाळण्यासाठी तुम्हाला योग्य उपचार मिळाले पाहिजेत.